वाशिम-जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजारांच्यावर गेली आहे. दर दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत आत्मा आणि कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सावंगा येथे शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
कृषी विभागाने घेतलेल्या शेतकरी कार्यशाळेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - workshop for farmers
कपाशीवर फवारणी करताना मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन अनेक शेतकरी ,शेतमजुरांचे बळी गेले होते. वाशिम जिल्ह्यात तशी अप्रिय घटना घडू नये म्हणून प्रकल्प संचालक, आत्मा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम तालुक्यातील सावंगा जहागीर येथे शेतकरी-शेतमजुरांची कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
कपाशीवर फवारणी करताना मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात विषबाधा होऊन अनेक शेतकरी ,शेतमजुरांचे बळी गेले होते. वाशिम जिल्ह्यात तशी अप्रिय घटना घडू नये म्हणून प्रकल्प संचालक, आत्मा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम तालुक्यातील सावंगा जहागीर येथे शेतकरी-शेतमजुरांची कार्यशाळा घेण्यात आली होती.
कृषी विभागाच्या कार्यशाळेत परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. मात्र, कोरोनाचा पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करता कार्यशाळा घेण्यात आल्याचे दिसून आले. कार्यशाळेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यात नियमांचे पालन न करता कार्यशाळा घेतली गेल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विभागाकडून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.