महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोषण महिन्यानिमित्त 6 कुपोषित बालके घेतली दत्तक; महिला ग्रामपंचायत प्रशासकांचा त्सुत्य उपक्रम - ansing grampanchayat news

प्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. या उपक्रमाचे औचित्य साधत वाशिमच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांनी अनसिंग गावातील ६ कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी दत्तक घेतले आहे. आपल्या गावात कुणीही कुपोषित राहायला नको या संकल्पनेतून त्यांनी हा निर्णय घेतला.

पोषण महिन्यानिमित्त 6 कुपोषित बालके घेतली दत्तक
पोषण महिन्यानिमित्त 6 कुपोषित बालके घेतली दत्तक

By

Published : Sep 18, 2020, 8:23 AM IST

वाशिम- राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत हा महिना पोषण महिना हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचे औचित्य साधत वाशिमच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांनी अनसिंग गावातील ६ कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी दत्तक घेतले आहे. गावचा प्रशासक या नात्याने आपली कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबात कुणीही कुपोषित राहायला नको या संकल्पनेतून त्यांनी हा निर्णय घेतला. या बालकांचा शारीरिक विकास व्हावा याकरीता बालकांना पोषक अन्नधान्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पोषण महिन्यानिमित्त 6 कुपोषित बालके घेतली दत्तक
जिल्ह्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या अनसिंग ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने याठिकाणी वाशिमच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. गावचा प्रशासक म्हणून गावाच्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचे ते मानतात. त्याच विचारातून आपल्या कुटुंबात कोणीही कुपोषित राहायला नको अशी संकल्प त्यांनी केला आणि पोषण महिन्याचे औचित्य साधत गावातील 6 कुपोषित बालके दत्तक घेतली. त्या बालकांना सुदृढ बालक करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.आजची बालके म्हणजे देशाचा उज्वल भविष्या असून ती सुदृढ व सशक्त असावी याकरीता शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच संकल्पनेतून सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. वाशिम जिल्ह्यात यानिमित्त नागरिकांच्या आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच महिला, किशोरवयीन मुले, स्तनदा माता यांना आहारातील पोषणमूल्ये देण्यात येत आहेत. या माध्यमातून त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत.दत्तक घेण्यात आलेल्या बालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या निकोप शारीरिक वाढी करीता आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना आपण करणार असल्याचे प्रशासक प्रियंका गवळी यांनी यावेळी सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सेवे व्यतिरिक्त सामाजिक जाणिवेतून वैयक्तिक रित्या कुपोषणा विरुद्ध चालविलेल्या या मोहिमेचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details