महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेची आडकाठी नाही.. केंद्रीय मंत्री गडकरींच्या लेटर बॉम्बवर खासदार गवळी यांचे उत्तर

'आमच्या रिसोडच्या शिवसैनिकाची जी ऑडियो क्लिप आहे, त्यामध्ये ते शिवसैनिक चांगले काम करावे, असे बोलत आहेत आणि त्या पाधिकाऱ्यांनी रिसोड शहरातील खड्डे स्वतः उभे राहून भरून घेतले आहेत. कोणीही काही अॅडियो क्लिप व्हायरल करत असतील याला काही अर्थ नाही, काही लोकांचे आमच्या विरोधात हे षड्यंत्र आहे. जाणून बुजून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गवळी यांनी केला.

खासदार गवळी
खासदार गवळी

By

Published : Aug 15, 2021, 2:18 PM IST

Updated : Aug 15, 2021, 3:43 PM IST

वाशिम- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर वाशिम-यवतमाळ मतदारसंघाच्या शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील नॅशनल हायवेची जवळपास 90 टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी ही कामे राहिलेली आहेत. ती फॉरेस्ट किंवा काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तर काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे तेथील काम थांबवलेले आहे. शिवसेनेने कुठल्याही कामात आडकाठी केली नाही, किंवा कोणतेही काम थांबवलेले नाही. गडकरी साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती गेली असावी, मी स्वतः गडकरी साहेबाना भेटून या सम्पूर्ण विषयावर चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण खासदार गवळी यांनी दिले आहे.

गडकरींच्या लेटर बॉम्बवर खासदार गवळी यांचे उत्तर
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनधी आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित एक अॅडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. यासंबधी पत्रकारांनी खासदार गवळी यांना प्रश्न विचारला असता, 'आमच्या रिसोडच्या शिवसैनिकाची जी ऑडियो क्लिप आहे, त्यामध्ये ते शिवसैनिक चांगले काम करावे, असे बोलत आहेत आणि त्या पाधिकाऱ्यांनी रिसोड शहरातील खड्डे स्वतः उभे राहून भरून घेतले आहेत. कोणीही काही अॅडियो क्लिप व्हायरल करत असतील याला काही अर्थ नाही, काही लोकांचे आमच्या विरोधात हे षड्यंत्र आहे. जाणून बुजून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गवळी यांनी केला.किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर बोलताना खासदार भावना गवळी यांनी उत्तर दिले की, ज्यांनी आरोप केले आहेत, त्यांनीच हे सांगावा की कुठून काय आले, ते आमचे पाहिले सहकारी राहिलेले आहेत. त्यांना माझ्या समोर बसावा, आणि मला विचारावे मी त्यांच्या आरोपाचे जरूर उत्तर देईल.
Last Updated : Aug 15, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details