महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा धडक मोर्चा - shivsena

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा धडक मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथे डफडे वाजवत काढण्यात आला मोर्चा

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा धडक मोर्चा

By

Published : Sep 18, 2019, 4:09 AM IST

Updated : Sep 18, 2019, 7:42 PM IST

वाशिम - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेने धडक मोर्चा काढला.
यावेळी डफडे वाजवत मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा धडक मोर्चा

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून शेतमालाला योग्य भाव द्यावा तसेच बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

हेही वाचा - शेतकरी अडचणीत: पीक विमा कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा कार्यलयात ठिय्या

यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी बाजार समिती सभापतींना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. या दरम्यान, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होता.

Last Updated : Sep 18, 2019, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details