वाशिम -शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध केला. जिल्ह्यातील वसारी गावात दगडाची पेरणी करून शेतकरी संघटनेने शासनाचा धोरणाला विरोध केला. शासनाने कर्जमाफी केली असली तरी अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला नाही.
'दगडाची पेरणी' करत शेतकरी संघटनेकडून शासनाचा निषेध; पिककर्ज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक - bjp
शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध केला. वाशिम जिल्ह्यातील वसारी गावात दगडाची पेरणी करून शेतकरी संघटनेने शासनाचा धोरणाचा विरोध केला.
जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली नसून, बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी ऐन खरीप हंगामात मेटाकुटीस आल्याचे चित्र आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वेळोवेळी पाठपुरावा करूनही बँका कर्ज देत नसल्यामुळे आज संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मालेगाव तालुक्यातील वसारी गावात चक्क दगडाची पेरणी करून शासनाचा निषेध केला.
शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुनही बँका शेतकऱ्यांनी पिक विम्याची रक्कम देत नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.