कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे - पालकमंत्री शंभूराज देसाई - Shambhuraj Desai news
कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. भविष्यातील कोरोना संसर्ग वाढीचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
वाशिम - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. भविष्यातील कोरोना संसर्ग वाढीचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (ता. १८) आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.