वाशीम - जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. शहरांतील बालू चौक येथील सोमाणी रेडीमेड कापड दुकानवर पोलीस व नगरपरिषदेने संयुक्त कारवाई करत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वाशीममध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कापड दुकान सील - वाशिम लाईव्ह
वाशीम जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तरीही नागरिक नियमाचा उल्लंघन करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. शहरातील बालू चौक येथील सोमाणी रेडीमेड यांच्या कापड दुकानवर पोलीस व नगरपरिषदेने संयुक्त कारवाई करत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वारंवार सूचना देऊनही काही दुकानदार कोरोना नियमांचे उल्लघंन करीत आहे. त्यामुळे पुढील आदेशांपर्यंत वाशीम शहरातील सोमाणी रेडीमेड हे दुकान सील करण्यात आले आहे. कारवाई नंतर पोलीस आणि नगर परिषद विभागाच्यावतीने दुकानदाराना आव्हान करण्यात आले आहे की, यानंतर विनापरवाना अत्यावश्यक सेवा सोडून कोणीही दुकान सुरू करू नये अन्यथा त्या दुकानावर कारवाई करुन दंड वसुल करण्यात येईल. ही कारवाई वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ध्रुवास बावणकर, नगर परिषदेचे लिपिक मनोज इंगळे व त्यांंच्या पथकाने केली.
हेही वाचा - सचिन वाझे आणि रियाझ काझी यांची 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ