महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममधील कारखेडातील एकमेव शाळेची अखेर घंटा वाजली - विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

कोरोनामुक्त गावांमध्ये 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती ग्रामपंचायतींचे ठराव मागविण्यात आले होते. त्यात मानोरा तालुक्यातील कारखेडा इथल्या ग्रामपंचायतने ठराव दिल्यामुळे जिल्ह्यात सध्यातरी एकमेव शाळा सुरू झाली आहे.

शाळा
शाळा

By

Published : Jul 15, 2021, 5:45 PM IST

वाशिम - कोरोनामुक्त गावांमध्ये 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती ग्रामपंचायतींचे ठराव मागविण्यात आले होते. त्यात मानोरा तालुक्यातील कारखेडा इथल्या ग्रामपंचायतने ठराव दिल्यामुळे जिल्ह्यात सध्यातरी एकमेव शाळा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसून आला आहे. जिल्ह्यात एकूण आज 200 शाळांच्यावर शाळा सुरू होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाशिममधील कारखेडातील एकमेव शाळेची अखेर घंटा वाजली

विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे जि. प. प्राथमिक शाळेतील १ ते ४ व येथीलच के. एल. देशमुख विद्यालयातील ८ ते १२ या वर्गाला आज सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. गावातील शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व सनियंत्रण समिती यांनी गावातील शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव पारीत केला होता. त्यानुसार आज शाळेची घंटा वाजली. यावेळी गावच्या सरपंचा सौ. सोनाली बबनराव सोळंके यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थांचे तापमान तपासणे, हात सॅनिटाईज करणे आणि मास्कसह प्रवेश देण्यात आला. त्या आधी शिक्षकांनी गावात फिरून १०० टक्के पालकांचे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबतचे समंती पत्र घेतले. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने शाळा निर्जंतुकीकरण करण्यात आले.

शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदांचे वातावरण

विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश आडे यांनी विद्यार्थ्यांना सर्व नियम अटी पाळून प्रवेश देण्यात आला. तर कारखेडा ग्रामपंचायतने वर्ग १ ते १२ सुरू करण्याच्या ठरावाला गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी अतिषय उत्साह दाखविला. मात्र, वर्ग ५ ते ७ सुरू करण्यास के. एल. देशमुख विद्यालयाचे शिक्षक निरुत्साही वाटले. गेल्या दिड वर्षांपासून शाळा बंद होत्या, आज शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, या संदर्भात आकाश अहाळे उपशिक्षण अधिकारी जि. प. वाशिम यांनी या संदर्भात विचारले असता त्यांनी आज वाशिम जिल्ह्यातील 73 शाळा सुरू झाले असल्याची माहिती दिली.

हेही वाचा -शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details