वाशिम- दिवसेंदिवस होत असलेली वृक्षतोड आणि झपाट्याने वाढत असलेल्या काँक्रिटीकरणामुळे पक्षांच्या संख्येत कमालीची घट होत आहे. त्यातच तापमाणात होणाऱ्या वाढीमुळं पक्षांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळं पशु पक्षांची तहान भागवण्याच्या उद्देशाने शेलुबाजार येथील वाईल्ड लाईफ टीम सरसावली आहे. सेव्ह बर्ड या उपक्रमाच्या माध्यमातून वाईल्ड लाईफच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत पक्षांना पाणी आणि खाद्य पुरविण्याचे काम सुरू केले आहे.
'सेव्ह बर्ड' उपक्रमाद्वारे पक्षासाठी पाणवठे; शाळकरी मुलांचे कौतुकास्पद अभियान
शेलुबाजार परिसरात प्रत्येक झाडावर कृत्रीम पाणवठे लावण्यात आले आहेत. असा उपक्रम प्रत्येकाने आपल्या शिवारात घर आंगण- परिसरात राबवावा, असे आवाहनही विद्यार्थी करीत आहेत. त्यांच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सेव्ह बर्ड'
या उपक्रमातंर्गत शेलुबाजार परिसरात प्रत्येक झाडावर कृत्रीम पाणवठे लावण्यात आले आहेत. असा उपक्रम प्रत्येकाने आपल्या शिवारात घर आंगण- परिसरात राबवावा, असे आवाहनही विद्यार्थी करीत आहेत. त्यांच्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या आवाहनाला जनतेमधून प्रतिसादही मिळत असल्याचे चित्र शेलू परिसरात पाहायला मिळत आहे.