वाशिम - शहरातील पाटणी चौकातील विजय जयस्वाल यांच्या घरी दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. नागरिकांनी सर्पमित्र सर्वेश फुलउंबरकर यांनी बोलावले. त्यांनी या सापाला पकडून जीवदान दिले.
वाशिममध्ये दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाला जीवदान
नागरिकांनी सर्पमित्र सर्वेश फुलउंबरकर यांनी बोलावले. त्यांनी या सापाला पकडून जीवदान दिले.
दुर्मिळ मांडूळ जातीचा साप
अंधश्रद्धेपोटी दुर्मिळ असलेल्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी केली जाते. त्यामुळे हा मांडूळ साप नामशेष होत चालला आहे. या मांडूळ सापाला फुलउंबरकर यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनविभागाने त्याला सुरक्षित जंगलात सोडले आहे.