महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात सॅनिटाइझरची फवारणी - spraying disinfectants in washim

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये कोरोना संसर्गापासून बचाव करिता उपाय योजना करण्यात येत आहेत. मात्र तरीही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावात कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून सॅनिटाइझरची फवारणी कऱण्यात येत आहे.

ग्रामीण भागात सॅनिटाइझरची फवारणी
ग्रामीण भागात सॅनिटाइझरची फवारणी

By

Published : Mar 15, 2021, 12:18 PM IST

वाशिम - जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाने विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीला गावात वर्दळीच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करून गावात फवारणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार अमानवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सर्वत्र हायड्रोक्लोरिक ॲसिडची गावात ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्वत्र फवारणी करण्यात आली.

ग्रामीण भागात सॅनिटाइझरची फवारणी
वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये कोरोना संसर्गापासून बचाव करिता उपाय योजना करण्यात येत आहेत. मात्र तरीही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. यावेळी अमानवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अशोक कांबळे सदस्य राजेश गणोदे ग्रामपंचायत कर्मचारी सचिन बासोळे कैलास भालेराव भीमसेन तायडे फटा भालेराव अमोल घाटोळे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details