महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सॅनिटाईज झाल्यानंतरच यापुढे रिसोड बाजार समितीमध्ये धान्य खरेदी

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला शेतमाल विक्रीस आणत आहेत. मात्र, दिवसेगणिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बाजार समितीमध्ये येणारे शेतकरी, खरेदीदार, अडते आणि हमाल यांना बाजार समितीमध्ये कोरोनाची बाधा होऊ नये, याठी बाजार समिती पुर्णतः सॅनिटाईझ करण्यात येत आहे.

Sanitation process in Risod Market Committee
रिसोड बाजार समितीमध्ये स‌ॅनिटाईज प्रक्रिया

By

Published : Jul 10, 2020, 5:05 PM IST

वाशिम - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दरदिवशी वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रिसोड बाजार समितीमध्ये शेतकरी, खरेदीदार, अडते आणि हमाल यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी समितीतील सर्व शेड तसेच प्रांगण सॅनिटाईझ करण्यात आले आहेत.

रिसोड बाजार समितीमध्ये स‌ॅनिटाईज प्रक्रिया....

सद्यस्थितीत रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला शेतमाल विक्रीस आणत आहेत. मात्र, दिवसेगणिक वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बाजार समितीमध्ये येणारे शेतकरी, खरेदीदार, अडते आणि हमाल यांना बाजार समितीमध्ये कोरोनाची बाधा होऊ नये, याठी बाजार समिती पुर्णतः सॅनिटाईझ करण्यात येत आहे. तसेच बाजार समितीत येणाऱ्यांची थर्मल तपासणी केल्यानंतरच धान्य खरेदीला सुरुवात करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि इतर नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा -खळबळजनक..! जादूटोण्याच्या संशयातून अमरावतीच्या सांभोऱ्यात बाप-लेकाची हत्या

बाजार समितीत कृषी माल खरेदी आधी करण्यात येणारी थर्मल तपासणी, बाजार समिती परिसर सॅनिटाईझ करणे, अशा उपाय योजना जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीने केल्या तर शेतकरी, हमाल, अडते यांच्यासाठी ते आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details