वाशिम - जिल्ह्यातील कारंजा येथील तहसीलदारांवर वाळू तस्करांनी केलेल्या हल्लेखोरांवर कारवाई करा, या मागणीसाठी आज कारंजा येथे विदर्भ पटवारी संघटना व महसूल कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कार्यलयासमोर काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. कारंजा येथील तहसीलदार यांनी रेती तस्करी करणाऱ्यांवर कार्यवाही केली होती. त्यामुळे त्यांच्यावर ट्रक चालकाने हल्ला केला होता. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी व त्यांना तत्काळ अटक करावे या मागणीसाठी आज विदर्भ पटवारी संघटना व महसूल कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कार्यलयासमोर आंदोलन केले.
तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला; काळ्या फिती लावून महसूल कर्मचाऱ्यांनी नोंदविला निषेध
कारंजा येथील तहसीलदार यांनी रेती तस्करी करणाऱ्यांवर कार्यवाही केली होती. त्यामुळे त्यांच्यावर ट्रक चालकाने हल्ला केला होता. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी व त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला; काळ्या फिती लावून महसूल कर्मचाऱ्यांनी नोंदविला निषेध
यावेळी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी यावर लक्ष घालून त्वरित आरोपीला अटक करून कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.