वाशिम- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संपूर्ण राज्यभर या पक्षांच्या सभा तसेच बैठका चालू असून, आज संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 52 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
संभाजी ब्रिगेड लढवणार विधानसभा निवडणूक; राज्यभरात 52 उमेदवारांची यादी जाहीर - washim assembly elections
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संपूर्ण राज्यभर या पक्षांच्या सभा तसेच बैठका चालू असून, आज संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 52 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
![संभाजी ब्रिगेड लढवणार विधानसभा निवडणूक; राज्यभरात 52 उमेदवारांची यादी जाहीर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4505194-thumbnail-3x2-washim.jpg)
संभाजी ब्रिगेड लढवणार विधानसभा निवडणूक
तसेच त्यांनी जिल्ह्यातील तीनही मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केले असून, वाशिम-मंगरुळपीर मतदार संघासाठी राहुल बलखंडे तसेच रिसोड विधानसभा मतदार संघातून डॉ. प्रशांत गावंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कारंजा विधानसभेसाठी माणिकराव पावडे यांना उमेदवारी दिली आहे.