महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महंत बाबूसिंग महाराज पोहरादेवी पीठाधीश्वरपदी.. रामराव महाराजांचा चालवणार वारसा! - banjara community news

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांचे नुकतेच देहावसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराज परिवारातील संपूर्ण आप्तांच्या उपस्थितीमध्ये संत डॉ. रामराव महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून महंत बाबूसिंग महाराज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

banjara community news
महंत बाबूसिंग महाराज पीठाधीश्वरपदी... रामराव महाराजांचा वारसा चालवणार!

By

Published : Nov 4, 2020, 10:40 PM IST

वाशिम - प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांचे नुकतेच देहावसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराज परिवारातील संपूर्ण आप्तांच्या उपस्थितीमध्ये संत डॉ. रामराव महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून महंत बाबूसिंग महाराज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

महंत बाबूसिंग महाराज पीठाधीश्वरपदी... रामराव महाराजांचा वारसा चालवणार!
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे ३० ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांचा पुढील वारसा चालवण्यासाठी भिमा नायक, खेमा नायक, हेमा नायक यांच्या घराण्याची बैठक घेण्यात आली. यावेळी संत रामराव महाराज यांचे पुतणे महंत बाबूसिंग महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून एकमताने निवड झाली . यावेळी संत रामराव महाराज यांना अग्नी दिलेल्या ठिकाणी मंदिर निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. संत रामराव महाराज महंत यांचा अस्थीकलश देशभर फिरवण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याचे महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details