महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल दिड महिन्यानंतर वाशिममध्ये धावणार लालपरी - एस टी महामंडळ न्यूज

तब्बल दीड महिन्यानंतर वाशिम जिल्ह्यातील एस. टी. महामंडळाच्या गाड्यांची चाक धावण्यासाठी सज्ज झाली आहेत. वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने इथे एस. टी. सेवा सुरू करण्यात आली आहे.

S T Bus services will start in washim
दिड महिन्यानंतर वाशिममध्ये धावणार लालपरी

By

Published : May 8, 2020, 6:30 PM IST

वाशिम - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दळणवळणाची सर्व साधनांची चाक बंद करण्यात आली होती. मात्र, आता तब्बल दीड महिन्यानंतर वाशिम जिल्ह्यातील एस टी महामंडळाच्या गाड्यांची चाक धावण्यासाठी सज्ज झाली आहेत. वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने इथे एस. टी. सेवा सुरू करण्यात आली आहे.

तब्बल दिड महिन्यानंतर वाशिममध्ये धावणार लालपरी
सोशल डिस्टन्सिंग आणि शासकीय नियमांचे पालन करून जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर लालपरी आता रस्त्यावरून धावणार आहे. जिल्ह्यात सध्या 50 टक्क्यांवर ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तर या बसेस केवळ तालुका ते तालुका आणि यामध्ये येणाऱ्या गावापर्यंतच धावणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश बस स्थानकावर शुकशुकाट पसरलेल दिसून येत आहे.
तब्बल दिड महिन्यानंतर वाशिममध्ये धावणार लालपरी
उद्यापासून दैनंदिन फेऱ्या पेक्षा 50 टक्क्यांवर बस फेऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. एस. टी. ची चाकं जरी धावण्यासाठी सुसज्ज असली तरी कोरोनाच्या भितीने प्रवाश्यांअभावी चाक थांबलेलीच आहेत.
तब्बल दीड महिन्यानंतर वाशिममध्ये धावणार लालपरी

ABOUT THE AUTHOR

...view details