महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Russia-Ukraine Crisis : युक्रेनमधून परतलेल्या साबीरने सांगितला विदारक अनुभव, वाचा.. - साबीर पठाण वाशिम आगमन

जिल्ह्यातील उर्वरीत ३ विद्यार्थीसुद्धा भारतात दाखल झाले असून, घरी येण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू आहे. दरम्यान साबीर पठाण या विद्यार्थ्याचे ४ मार्च रोजी दिल्लीहून औरंगाबादला आगमन झाले. औरंगाबादहून खासगी वाहनाने शनिवारी रात्री उशिरा त्याचे गावात आगमन झाले.

Sabir Pathan arrived washim
साबीर पठाण युक्रेन अनुभव

By

Published : Mar 5, 2022, 3:30 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील उर्वरीत ३ विद्यार्थीसुद्धा भारतात दाखल झाले असून, घरी येण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू आहे. दरम्यान साबीर पठाण या विद्यार्थ्याचे ४ मार्च रोजी दिल्लीहून औरंगाबादला आगमन झाले. औरंगाबादहून खासगी वाहनाने शनिवारी रात्री उशिरा त्याचे गावात आगमन झाले. मृत्यूच्या दाढेतून सुटका होवून आल्याने गावकऱ्यांनी मध्यरात्री साबीर पठान याचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी कुटुंबासह गावात भावनिक वातावरण तयार झाले होते.

माहिती देताना साबीर पठाण आणि त्याचे वडील

हेही वाचा -Swabhimani Shetkari Sanghatana : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुंडन आंदोलन

युक्रेनमधील टर्नोपिल राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत असलेला साबीर अडीच महिन्यांपूर्वीची विदेशात गेला होता. हजारो भारतीय विद्यार्थ्यांसोबत २५ ते ३० किलोमीटरची पायपीट करीत तो शेजारील रोमानिया या देशात दाखल झाला. चार दिवस विना अन्नपाणी रांगेत उभ राहून रोमानियात पोहचल्याचे त्यांने यावेळी बोलताना सांगितले.

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थीही परतले

युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या आठवड्यापासून युद्ध ( Russia-Ukraine Crisis ) सुरू असून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत अण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील 134 विद्यार्थी हे अडकले होते. यातील 75 विद्यार्थी ( students from Ukraine arrive at Pune Airport ) हे परत आले असून 59 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले पुणे शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशी असलेले 16 विद्यार्थ्यांचे रात्री 1.30 वाजता पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पुष्पहार घालून आणि पेढे भरवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय सुद्धा हजर होते.

हेही वाचा -Nana Patole Slammed BJP : संजय राऊत हे भाजपच्या नेत्यांचे भ्रष्टाचार समोर आणणार म्हणून ईडी... नाना पटोलेंचा टोला

ABOUT THE AUTHOR

...view details