वाशिम- निवडणुकीच्या सुरक्षाव्यवस्थेचा संपूर्ण भार खांद्यावर वाहणाऱ्या जवानांची अवस्था विदारक असल्याचे समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील सिद्धेश्वर पेट्रोल पंपावर उघड्यावर झोपलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांचे फोटो व्हायरल झाले आहेत. राज्य राखीव दलाच्या एका जवानाने आपल्या वरिष्ठांना लिहिलेल्या पत्रातून बंदोबस्ताच्या नावाखाली जवानांचा होणारा छळ आणि हालअपेष्टांची विदारक अवस्था समोर आली आहे.
मतदान केंद्रावरील बंदोबस्ताला आलेले एसआरपीएफचे जवान राहिले उपाशी : राहण्याची सोय न केल्याने रस्त्यावरच विश्रांती - पेट्रोल
रात्रभर प्रवास करुन पथक सकाळी ४ वाजता पेट्रोल पंपात पोहोचले. पथकातील जवानांना सकाळचे विधीही करायला वेळ दिला नाही. कारंजा लाडपासून सकाळी ६ वाजता पुण्याकरता निघाले आणि आज १३ एप्रिलला दुपारी १ वाजला तरी पोटात अन्न नाही. सतत प्रवासाने आमची शारीरिक प्रकृती आणि मानसिक स्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत खाण्याची, जेवण्याची तसेच राहण्याची व्यवस्था न करताच वरिष्ठ अधिकारी परस्पर रजेवर निघून गेले आहेत, अशी पोस्ट या कर्मचाऱ्याने लिहिली आहे.
जवानाने आपल्या पत्रात म्हटले आहे, १० एप्रिलला राज्य राखीव दलाचा एक गट बंदोबस्तासाठी चिंचगड पोलीस ठाण्याला पोहोचला. त्यानंतर ११ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता हा गट पुढील बंदोबस्तासाठी गोंदियाला रवाना झाला. नक्षली ड्युटी असल्याने तिथे आराम करणे शक्य नव्हते. निवडणूक ड्युटी संपताच गोंदियातील बोरगावातल्या बेस कॅम्पवर आम्ही परतलो. परंतु ५ मिनिटही आराम मिळाला नाही. तेथून लगेच पुणे ग्रामीण बंदोबस्ताला निघण्याचे आदेश मिळाले.
रात्रभर प्रवास करुन पथक सकाळी ४ वाजता पेट्रोल पंपात पोहोचला. पथकातील जवानांना सकाळचे विधीही करायला वेळ दिला नाही. कारंजा लाडपासून सकाळी ६ वाजता पुण्याकरता निघाले आणि आज १३ एप्रिलला दुपारी १ वाजला तरी पोटात अन्न नाही. सतत प्रवासाने आमची शारीरिक प्रकृती आणि मानसिक स्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत खाण्याची, जेवण्याची तसेच राहण्याची व्यवस्था न करताच वरिष्ठ अधिकारी परस्पर रजेवर निघून गेले आहेत, अशी पोस्ट या कर्मचाऱ्याने लिहिली आहे.