वाशिम - जिल्ह्यातील राजुरा-मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुकांडा शेतशिवारात विजेच्या धक्क्याने 4 (नीलगाय) रोहींचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विजेच्या धक्क्याने रोहींचा मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील सुकांडा शेत शिवारातील घटना रोहीचा मृत्यू जवळपास आठवड्याभरापुर्वी झाला मृत्यू
सुकांडा येथील शेतकरी पांडुरंग घुगे यांच्या शेताजवळ गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेतशिवारातील काही शेतकऱ्यांनी दुर्गंधी येत असलेल्या जागेवर जाऊन पाहणी केली. दरम्यान, त्यांना विजेच्या तारांली काही रोहींचा मृत्यू पडल्याचे दिसून आले. रोहिच्या शरीराचे केवळ हाडांचे सांगाडेच घटनास्थळावर दिसून आले आहेत. रोहीचा मृत्यू जवळपास आठवड्याभरापुर्वी झाल्याचा अंदाज यावेळी वर्तवण्यात येत आहे.
महावितरणचा हलगर्जिपणा
या ठिकाणारून वीजेच्या मुख्य प्रवाहाची लाईन गेलेली आहे. मागील अनेक दिवसांपासून लाईनचे दोन पोल खाली वाकले आहेत. त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वेळोवेळी करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या हलगर्जिपणामुळे चार नीलगायचा बळी गेला आहे. त्यामुळे आतातरी अशा लोंबकळलेल्या विद्युत वहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.