वाशिम - जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. जऊळका येथे राहत असलेले कला दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच्या घरी रात्रीच्या सुमारास चोरी झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
हिंदी चित्रपट सृष्टीत कला दिग्दर्शकाचे काम करणारे लीलाधर सावंत यांच्या घरी दुसऱ्यांदा ही चोरी झाली आहे. कोरोना काळात कला क्षेत्रातील अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. लीलाधर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना बोलण्यासही अडचण होत आहे. त्यांच्याजवळ केवळ दागिने व 20 हजार रुपयांची रोकड होती. मात्र, चोरट्यांनी सर्व मुद्देमाल पळवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे.