काटेरी फांद्या टाकून अडवली वाशिम जिल्ह्यातून होणारी चोरटी वाहतूक
यवतमाळ जिल्ह्यातून येणाऱ्या मुख्य मार्गावरील सोमठाणासह ग्रामीण भागातील सुकळी, दुघोरा सह वडगाव फाटा रस्त्यावर चेक पोस्ट सुरू करून जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी होत आहे.
वाशिम -राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, वाशिम जिल्हा 'ग्रीन झोन'मध्ये असल्याने लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाली असून जिल्हात दारू विक्री सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या शेजारी जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत असून, रेड झोन जिल्ह्यामध्ये असलेले नागरिक वेगवेगळ्या चोरट्या मार्गाने दारू खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी यवतमाळला जोडला जाणाऱ्या मार्गावर काटेरी फांद्या टाकल्या आहेत.