वाशिम - पोलिसांचे काम असते कायदा व सुव्यवस्था प्रस्थापीत करणे व नागरिकांचे संरक्षण करणे. मात्र, रिसोड येथील पोलीस ठाण्याचे अंमलदार नेहमीप्रमाणे कामकाज करत आपल्या कक्षात बसले असता, अचानक त्यांच्यावर छत कोसळले. यात ते किरकोळ जखमी झाले असून थोडक्यात बचावले.
रिसोडच्या ठाणे अंमलदाराच्या कक्षातील छत कोसळला; ठाणेदारासह अन्य ५ जखमी - वाशिम पोलीस
पोलिसांचे काम असते कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे व नागरिकांचे संरक्षण करणे. मात्र, रिसोडच्या पोलीस ठाण्याचे अंमलदार नेहमीप्रमाणे कामकाज करत आपल्या कक्षात बसले असता, अचानक त्यांच्यावर छत कोसळले. यात ते किरकोळ जखमी झाले असून थोडक्यात बचावले.
रिसोडच्या ठाणे अंमलदाराच्या कक्षातील छत कोसळला
एका प्रकरणातील तक्रारदार व अन्य नागरिकांशी चर्चा करत असताना अचानक कक्षाचे जीर्ण झालेले छत खाली कोसळले. यामुळे एकच धावपळ उडाली. या घटनेत रिसोडचे ठाणे अंमलदार अनिल ठाकरे यांच्यासह इतर ५ जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून या घटनेत ठाणेदार ठाकरे यांच्या हाताच्या करंगळीला व पाठीला दुखापत झाली. तसेच यावेळी कक्षात बसून असलेले पोलिस पाटील मंगेश सरनाईक यांच्यासह अरूण साबळे, वंदना दीपक लाड यांनाही किरकोळ स्वरूपात जखम झाली आहे.