महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत, 20 क्विंटल कांदा नदीत दिला फेकून - वाशिम 20 क्विंटल कांदा नदीत फेकले बातमी

लॉकडाऊनमुळे आसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जवळच्या विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फरफट होत आहे. अमरावती , यवतमाळ , याठिकाणी जाणारा कांदा लॉकडाऊनमुळे नेण्यात अडचणी होत्या. ‘लॉकडाऊन’ मुळे मालाला भाव नाही; आर्थिक चणचणीमुळे नाईलाजाने कांदा विक्री करता आली नाही. कांद्याचे भाव पाच महिन्या अगोदर 2100 रुपये क्विंटल होते ते आता 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल आले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात डोळ्यात पाणी आणण्याची वेळ आली आहे.

risod and mangrulpir onion farmer
लॉकडाऊनने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

By

Published : Jul 16, 2020, 10:20 AM IST

Updated : Jul 16, 2020, 10:45 AM IST

वाशिम -कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहे. आजपासून जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आली असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील मंगरूळपीर व रिसोड शहर आज सात दिवसासाठी पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे मंगरूळपीर तालुक्यातील शिवनी येथील शेतकरी शामराव राजाराम कुटे यांच्या शेतातील कांदा विक्रीला आणला असता विकता आला नाही. आज भाव अचानक पडल्यामुळे कांदा विक्रीतून नफा मिळत नसल्या कारणाने शेतकऱ्यांनी 20 क्विंटल कांदा नदीमध्ये फेकून दिला.

लॉकडाऊनने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत, 20 क्विंटल कांदा नदीत दिला फेकून
लॉकडाऊनमुळे आसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जवळच्या विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फरफट होत आहे. अमरावती , यवतमाळ , याठिकाणी जाणारा कांदा लॉकडाऊनमुळे नेण्यात अडचणी होत्या. ‘लॉकडाऊन’ मुळे मालाला भाव नाही; आर्थिक चणचणीमुळे नाईलाजाने कांदा विक्री करता आली नाही. कांद्याचे भाव पाच महिन्या अगोदर 2100 रुपये क्विंटल होते ते आता 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल आले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात डोळ्यात पाणी आणण्याची वेळ आली आहे.अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यात लॉकडाऊनमुळे शेती उत्पादीत मालाला भाव नाही आणि त्यात कांद्याचे भाव एकदम गडगडले अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. पाच महिन्यापूर्वी 2100 रुपये प्राति क्विंटल दर मिळालेला कांदा आता दर कमी झाल्यामुळे शेतकरी वर्गाला रडविण्याच्या तयारीत आहे. एक एकर कांदा पिकासाठी मशागत खर्च किमान 5000 रुपये रोप,रोप लागवड 7000 रुपये, फवारणी 2000 रुपये, खुरपणी 1000 रूपये, काढणी 9500 रुपये, कांदा गोणी 30 रूपये, टेम्पोत गोणी भरणे प्रति गोणी 10 रुपये, टेम्पो भाडे प्रति गोणी 30 रुपये, बाजार समिती हमाली तोलाई प्रति गोणी 10 रुपये असा किमान खर्च आहे. चालू वर्षी वातावरणातील बदलामुळे सरासरी एकरी उत्पादन 100 क्विंटलपर्यंत आहे. उत्पादन खर्च एकरी 40000ते 50000 हजारापर्यंत होतो.सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील कांदा खरेदी करणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. तर स्थानिक व्यापारी अत्यंत कमी भावात खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सलग दोन वर्ष नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पैशाची चणचण असल्यामुळे गरजेनुसार मालाची विक्री नाईलाजाने करत आहे. सध्या तरी कांद्याच्या भावामुळे आसेगाव परिसरातील शेतकरी अडचणीत आला आहे.
Last Updated : Jul 16, 2020, 10:45 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details