वाशिम - महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
महसूल कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन हेही वाचा - वाशिम: लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सायकलवारी
शासनाकडून तत्वतः मागण्या मान्य होऊन ६ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अजूनही शासनाकडून कोणतेही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले नाही. याविरोधात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्वच महसूल कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
हेही वाचा- मी सत्तेच्या मागे जात नाही, मी जिथे जातो, तिथे सत्ता येते - रामदास आठवले