वाशिम - पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील नागरिकांना रोज भटकंती करावी लागते. हीच परिस्थिती वन्यप्राण्यांची आहे. मात्र, कारंजा तालुक्यातील काजना येथील रतन वानखेडे गेल्या अनेक वर्षांपासून माकडाची तहान भागविण्याचे काम करत आहेत.
ऐन दुष्काळात ४ कि.मी. सायकल चालवून 'तो' भागवतोय माकडांची तहान - दुष्काळ
वाशिममधील पाणी टंचाईमुळे वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे.
रतन वानखेडे माकडांना अन्न आणि पाणी देताना
वानखेडे हे स्वतः ४ किलोमीटर सायकल चालवून माकडांसाठी खाद्याची आणि पाण्याची व्यवस्था करतात. विशेष म्हणजे स्वतः भूमिहीन असूनही हमाली काम करुन ते आपला उदरनिर्वाह करतात. वन्यजीवांची सेवा करण्याच्या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Last Updated : May 22, 2019, 3:46 PM IST