वाशिम - मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदीमय वातावरणात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त विविध मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज अदा करून एकमेकांना अलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
वाशिम जिल्ह्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी - malegaon
रमजान ईदनिमित्त वाशिम जिल्ह्यात मुस्लीम बांधवांनी एकमेकांनी शुभेच्छा देत ईद साजरी केली. शहरातील सर्व मशिदीमंध्ये नमाज अदा करण्यात आली
वाशिम जिल्ह्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी
रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुस्लीम बांधवांनी नमाजासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच ईदगाह मैदानावर येण्यास सुरवात केली. ईदगाह परिसरात सामुहिक नमाज पडण्यात आली. वाशिम, मालेगावमध्ये सकाळी ९ तर कारंजा येथे १० वाजता नमाज अदा करण्यात आली. तत्पूर्वी शहरातील सर्वच मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.