महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपहरणानंतर 19 दिवस उलटूनही अल्पवयीन तरुणीचा तपास नाही; वाशिमकरांचा जनआक्रोश मोर्चा - वाशिम मराठा क्रांती मोर्चा

जिल्ह्यात मागील वर्षभरात 63 मुलीचे अपहरण झाले असून, त्यापैकी 18 मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही. या प्रकरणांचा तपास लवकन न लागल्यात तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

washim
वाशिमकरांचा जनआक्रोश मोर्चा

By

Published : Feb 8, 2020, 3:25 AM IST

वाशिम -19 जानेवारीला शहरातील 15 वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. या घटनेला 19 दिवस उलटूनही अद्याप पोलीसांना तपास लागलेला नाही नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी जनआक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी मराठा क्रांती मोर्चासह सर्व राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

वाशिमकरांचा जनआक्रोश मोर्चा

जिल्ह्यात मागील वर्षभरात 63 मुलीचे अपहरण झाले असून, त्यापैकी 18 मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यातही अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या घटना वाढत असून, 19 जानेवारीला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. अनेक दिवस उलटूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्ही जनआक्रोश मोर्चा काढला असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले. शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा शहर पोलीस ठाण्यावर धडकला. यावेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी मुलीचा लवकरात लवकर शोध न घेतल्यास उग्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details