महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पॉवर टिलर' शेतकऱ्यांसाठी वरदान, एक लिटर पेट्रोलमध्ये डवरणी!

जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्याकडे बैलजोडी नाही. त्यामुळे शेतकरी भाड्याने बैल घेऊन पिकांची डवरणी करतात. त्यासाठी दिवसाला आठशे ते हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, पॉवर टिलर मशिनमुळे हे काम सोपे झाले आहे.

By

Published : Jul 18, 2020, 12:46 PM IST

washim farmers
'पॉवर टिलर' शेतकऱ्यांसाठी वरदान..एक लिटर पेट्रोलमध्ये डवरणी!

वाशिम - जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्याकडे बैलजोडी नाही. त्यामुळे शेतकरी भाड्याने बैल घेऊन पिकांची डवरणी करतात. त्यासाठी दिवसाला आठशे ते हजार रुपये मोजावे लागतात.

'पॉवर टिलर' शेतकऱ्यांसाठी वरदान..एक लिटर पेट्रोलमध्ये डवरणी!

मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील अभिमन्यू पवार यांनी पावर टिलरने डवरणी करत केल्याने एक लिटर पेट्रोलमध्ये एक एकर शेतातील डवरणीचे काम होत आहे. दिवसातून चार एकर डवरणीचे काम पॉवर टिलर सहजरित्या करत असल्याची माहिती फुलउमरी येथील प्रयोगशील शेतकरी अभिमन्यू चव्हाण यांनी दिली.

'पॉवर टिलर' शेतकऱ्यांसाठी वरदान..एक लिटर पेट्रोलमध्ये डवरणी!
बैल जोडीचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना बैलजोडी घेणे खर्चिक झाले आहे. ग्रामीण भागात जनावर आजारी पडल्यास त्यावर उपचारासाठी शेतकऱ्यांना तज्ञ वैद्यकीय अधिकारी मिळत नाही. उपचाराअभावी जनावरे दगावतात. एकत्रित कुटुंब पद्धतीत शेतीची वाटणी होत असल्याने कमी शेती असणाऱ्यांना महागडी बैलजोडी घेणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी यंत्राच्या सहाय्याने पेरणी, औषध फवारणीपासून आंतर मशागतीची कामे करत आहे.बाजारातील पॉवर टिलर मशीन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पॉवर टिलरने एक माणूस आपल्या शेतातील चार एकर डवरणीचे काम सहज करू शकतो. यासाठी त्याला एकरी एक लिटर पेट्रोलचा खर्च येतो.

ABOUT THE AUTHOR

...view details