वाशिम -चामुंडा देवी परिसरात एका खासगी लाईनमनला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. कैलास सरकटे, असे या लाईनमनचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. शासकीय लााईनमनच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असून याला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत जखमी युवकाला आर्थीक मदत करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
चौकशी करून कारवाई करण्यात येईल -
स्थानिक चामुंडा देवी परिसरात काल एका वीज ग्राहकाने काही कामासाठी खासगी लाईनमन कैलास सरकटे याला बोलावले होते. विजेचा खांबावर काम करत असताना त्याला विजेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना न बोलवता खासजी लाईनमनला का बोलवले, याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता तायडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - School Reopen : आजपासून शाळांची घंटा वाजणार; 'अशी' असेल व्यवस्था