वाशिम - विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण अनेक राजकीय नेत्यांना पक्ष बदलताना पाहिलंय तर काहींनी तिकीट मिळाले नसल्याने पक्ष बदलले. मात्र, कारंजा - मानोरा विधानसभा मतदारसंघ युतीत ही जागा भाजपला सुटल्याने प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला व त्यांना येथून उमेदवारीसुद्धा मिळाली. मात्र, तरीही त्यांच्या एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात शिवबंधन बांधल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा - 'त्याने' तिघांना वाचवले...पण सख्ख्या भावालाच वाचवू शकला नाही
त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली सभासुद्धा घेतली आहे. या सभेत माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी प्रकाशदादा डहाके यांना शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधण्यासाठी सांगितले. मात्र, प्रकाशदादांनी शिवबंधन सोडले नसून त्यांनी आपल्या भाषणात एका हातात शिवबंधन तर दुसऱ्या हातात घड्याळ बांधले. हा सर्व प्रकार पक्षप्रमुख शरद पवार यांच्या समोर घडल्याने हे पाहून तर शरद पवारही विचारात पडले असतील, अशी चर्चा होत आहे.