वाशिम- विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपचे अमित शाह आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारसभेत 370 चा मुद्दा घेत आहेत. मात्र, भाजप सरकार दलालाचे सरकार आहे. काश्मीरच्या जमिनी घेण्यासाठी 370 कलम रद्द केली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाशिममध्ये आले असता बोलत होते.
आज देशातील शेतकऱ्यांची चिंता कोणत्याच पक्षाला नाही. काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस ईडीला घाबरतात तर सेना ही त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे हमीभावाबद्दल कुणीच बोलत नाही. शेतकरी संघटनेचे नेते सर्वच मूर्ख असल्याची टीका ही यावेळी आंबेडकर यांनी जाहीर सभेत केली आहे.