महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिसोड तहसील कार्यालयातील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित - विद्युत पुरवठा खंडित बातमी

विद्युत पुरवठाच नसल्याने कार्यालयीन कामे बंद असल्याचे नागरिकांना सांगण्यात येत आहे. दरम्यान कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रिसोड तहसील
रिसोड तहसील

By

Published : Mar 12, 2021, 3:18 PM IST

वाशिम:वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसील कार्यालयातील विद्युत पुरवठा तब्बल दोन दिवसांपासून खंडित आहे. यावरुन विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. दोन दिवसांपासून विदुयत पुरवठा खंडित असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे ऑनलाइन कामे बंद असून यामुळे विविध महत्त्वपूर्ण दाखले मिळण्यास विलंब होत आहे.

प्रकारावर नागरिकांकडून संताप
तहसील कार्यालयात वीज नसल्याने अधिकारी व कर्मचारी दिवसभर बसून असल्याचे दिसून आले. काॅम्प्युटर बंद असल्याने कोणत्याही नकला (दस्तऐवज) देण्याचे, तसेच अन्य काम होऊ शकले नाहीत. महत्त्वाच्या कामासाठी अधिकाऱ्यांना दुसऱ्या कार्यालयात जाऊन काम करण्याची वेळ आली आहे. विद्युत पुरवठाच नसल्याने कार्यालयीन कामे बंद असल्याचे नागरिकांना सांगण्यात येत आहे. दरम्यान कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी विद्युत पुरवठा खंडित असल्याचे कारण अस्पष्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details