महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय सलाईनवर; आर्थिक मदतीची मागणी - poultry business washim

कोरोना विषाणूच्या अफवेमुळे गत महिन्याभरापासून कोंबडी विकत घ्यायला ग्राहक येत नसल्याने पोल्ट्री व्यवसाय प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

poultry business washim
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना पोल्ट्री व्यवसायिक

By

Published : Mar 11, 2020, 7:29 PM IST

वाशिम- जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे कोरोना विषाणूच्या अफवेमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक नुकसान भरपाई देऊन सोशल मीडियामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

माहिती देताना शेख रियाज शेख सत्तार, पोल्ट्री व्यवसायिक

कोरोना विषाणूच्या अफवेमुळे गत महिन्याभरापासून कोंबडी विकत घ्यायला ग्राहक येत नसल्याने पोल्ट्री व्यवसाय प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे, शासनाने पोल्ट्री नुकसानीचे सर्वेक्षण करून व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी, तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील पोल्ट्री धारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा-कोरोनाची अशीही दहशत...साखरपुड्याच्या कार्यक्रमातचं आटोपलं लग्न...

ABOUT THE AUTHOR

...view details