महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा - painanganga River Alert to vashim citizens

पेनटाकळी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यातील करडा-गोभणीसह धोडप बुद्रुक हा ग्रामीण मार्ग आता बंद झाला आहे. पाऊस चालूच राहिला तर पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पैनगंगा नदीवरील गोभणीसह धोडप बुद्रुक हा ग्रामीण मार्ग बंद झाला आहे

By

Published : Sep 26, 2019, 5:33 PM IST

Updated : Sep 26, 2019, 6:31 PM IST

वाशिम - जिल्ह्यात संततधार पावसामुळे आणि बुलडाण्यातील पेनटाकळी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यातील करडा-गोभणीसह धोडप बुद्रुक हा ग्रामीण मार्ग आता बंद झाला. पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशार दिला आहे..

पैनगंगा नदीवरील गोभणीसह धोडप बुद्रुक हा ग्रामीण मार्ग बंद झाला आहे

हेही वाचा - पेनटाकळी धरणाचे 9 दरवाजे उघडले ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

रिसोड तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. तसेच पेनटाकळी प्रकल्पाच्या ९ क्रमांकाच्या दरवाज्यांमधून ९ हजार ९५० क्युसेक वेगाने पैनगंगेत पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. गुरूवारी सकाळपासून करडा-गोभणी व धोडप बुद्रुक हा मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे. पेनटाकळी प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - परतीच्या पावसाने प्रकल्प भरले तुडुंब; संगमेश्वर प्रकल्प ओव्हर फ्लो

धरणातून विसर्ग वाढवला तर रिसोड व वाशिम तालुक्यातील पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून पूरस्थिती निर्माण होऊ शकेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - ईडी कारवाई प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक; घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Last Updated : Sep 26, 2019, 6:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details