वाशिम - जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतच्या 13 जागांसाठी उद्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार (Manora Nagar Panchayat Election 2021) असून 22 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह भाजपा, वंचित स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली आहेत. यावेळी मानोरा नगर पंचायतवर कुणाची सत्ता स्थापन होते हे 22 डिसेंबरच्या निकालावरून दिसून येणार आहे.
सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर
वाशिमच्या मानोरा नगरपंचायत क्षेत्रातील 13 प्रभागात होत असलेल्या निवडणूक 59 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे 13, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13, भाजपचे 8, शिवसेनेचे 12 वंचित बहुजन आघाडीचे 6, बसपाचे 2 अपक्ष 5 असे उमेदवार एकमेकांसमक्ष उभे ठाकले आहेत. सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढत असून 21 ला मतदान आहे. (Nagar Panchayat Election 2021) आज प्रचार थंडावला असून घरोघरी भेटी देण्यासाठी चढाओढ लागली आहे. कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.