वाशिम -कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टाळेबंदीचा ताण पोलीस प्रशासनावर पडत आहे. संचारबंदीतून मोकळीक मिळाल्यानंतर रस्त्यावर होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करणे पोलिसांसाठी मोठे जीकरीचे काम झाले आहे. त्यासाठी शहर पोलीसांनी दोरीच्या सहायाने वाहतूक थांबवून वाहनांना दिशा दाखवण्याचे काम सुरु केले आहे.
वाशिम शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या प्रमुख पाटणी चौकात ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची कार्यवाही ३१ मार्च अखेर पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे हे काम होऊ शकले नाही. त्यामुळे आज सिग्नलच्या भूमीकेत पोलीस काम करत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.