महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस अधिक्षकांचा दणका; व्यापारी लूटप्रकरणी 2 पोलीस सेवेतून बडतर्फ

कमी किमतीत सोने देण्याच्या आमिषाने पुण्याच्या व्यापाऱ्याला लुटल्याने राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दोन पोलिसांना बडतर्फ केले.

पोलीस अधीक्षक वसंत परदेशी

By

Published : Mar 21, 2019, 10:57 AM IST

वाशिम - कमी रकमेत 3.5 किलो सोने देतो, अशा आमिषाने पुण्याच्या व्यापाऱ्याला उमरखेडला बोलावून 12 लाखांना लुटण्यात आले होते. या घटनेत सहभागी असल्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी केली. मुकेश श्रीराम गौरखेडे आणि कैलास मंगूसिंग राठोड अशी बडतर्फ पोलिसांची नावे आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील रणजीत पांडूरंग गायकवाड यांना कमी किमतीत 3.5 किलो सोने देण्याचे आमिष देऊन सोने न देता धमकावून त्यांच्याजवळचे 12 लाख रुपये घेऊन पोलिसांनी पोबारा केला. मुकेश श्रीराम गौरखेडे (वय 35) आणि कैलास मंगूसिंग राठोड (वय 40) यांनी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले होते. गौरखेडे हा मंगरुळपीर पोलीस ठाण्यात तर, राठोड हा कारंजा पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत होता. या दोघांशिवाय रवी श्यामराव कानडे (वय 23, रा. मथनी, ता. मानोरा) याला पोलिसांनी 18 मार्चला ताब्यात घेतले होते.

19 मार्चला अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना उमरखेड येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पोलीस दलातील दोन्ही आरोपी कर्मचाऱ्याना तडकाफडकी सेवेतून बडतर्फी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details