वाशिम - शेतकऱ्याचा मित्र असलेले विविध जातीचे साप शहरात अंधश्रद्धेपोटी तस्करीचे शिकार होऊ लागले आहेत. असाच प्रकार वाशिम जिल्ह्यातील लही शेतशिवारात समोर आला आहे. येथे तस्करीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापाला ताब्यात घेऊन पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले.
शेतकऱ्याचा मित्र असलेल्या मांडूळाला पोलिसांनी दिले जीवदान - लही
तस्करीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापाला ताब्यात घेऊन पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले आहे.
मांडूळ दाखवताना पोलीस
आसेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख यांना गुप्त माहितीनुसार मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार लही शेतशिवारातील कलंदर खान यांच्या शेतातील एक सिमेंटच्या कोरड्या टाकीत तीन फूट लांबीचा आणि अंदाजे तीन किलो वजनाचा तपकिरी रंगाचा मांडूळ जातीचा साप आढळला. त्याला कोणतीही इजा न होऊ देता ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करत असेगाव पोलिसांनी वनविभागाच्या ताब्यात दिले.