वाशिम - धनज पोलिसांनी कामरगावपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या उंद्री शिवारातील उंद्री सिंचन प्रकल्पात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याचे प्रात्याक्षिक केले. यात पोलिसांसह कारंजा येथील सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचा चमू सहभागी झाला होता. पावसाळा तोंडावर असल्याने व पावसाळ्यात एखादा व्यक्ती धरणात बुडाल्यास त्याला कसे वाचवावे याचे प्रात्यक्षिक धनज पोलिसांनी करून दाखविले.
वाशिम : बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी उंद्री सिंचन प्रकल्पात पोलिसांचे प्रात्याक्षिक - वाशिम लेटेस्ट न्यूज
पोलिसांच्या या मॉक ड्रिलमुळे सभोवतालच्या परिसरात उंद्री सिंचन प्रकल्पात व्यक्ती बुडाल्याची वार्ता पसरली. परंतु त्यानंतर काही वेळाने हे पोलिसांचे प्रात्यक्षिक असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पोलीस मॉक ड्रिल
Last Updated : Jun 9, 2021, 10:00 PM IST