वाशिम -येथे कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून मारहाण केल्याची तक्रार वाशिम शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असून, त्यांच्यावर ३७६सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून,पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षकावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षकाचा महिला पोलीस कर्मचाऱ्यावर घरात घुसून अत्याचार - Washim Crime News
पोलीस निरीक्षकाचा महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशिम पोलिसात 376नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
वाशिम शहर पोलिसांत ३७६नुसार गुन्हा दाखल -
वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात २००७मध्ये विश्वकांत गुट्टे पीएसआय पदावर कार्यरत असताना सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांची ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी वाशिममध्ये आरोपी घरी आला असता त्यांनी जबरदस्ती करीत अत्याचार केला आहे. याप्रकरणी गुरूवारी रात्री वाशिम शहर पोलिसांत ३७६नुसार गुन्हा दाखल आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अलका गायकवाड करीत असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितले.