वाशिम- येथील पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 26 फेब्रुवारी) रात्री उघडकीस आली आहे. सुरज भेंडेकर (वय 28 वर्षे), असे पोलीस शिपायाचे नाव आहे.
वाशिममध्ये पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या - आत्महत्या
घरगुती वादातून वाशिम येथील शिपायाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
मृत सुरज भेंडेकर
सुरज यांनी वाशिम तालुक्यातील चिखली रोडवरील गिट्टी खदान परिसरातील्या एका झाडाला गळफास घेतला. घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -बाजारभाव नसल्याने 2 एकर वांग्याच्या पिकावर फिरवला रोटर, वाशिममधील प्रकार