वाशिम - जिल्ह्यात मागील 6 दिवसात 60 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात काल (शनिवार) 24 तासात 24 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी नवीन नियम घालून दिले आहेत. नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येत आहे.
वाशिम : विनाकारण फिरणाऱ्या 300 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई - वाशिम पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
जिल्ह्यात मागील 6 दिवसात 60 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात काल (शनिवार) 24 तासात 24 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी नवीन नियम घालून दिले आहेत.
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना मात्र, विनाकारण फिरणाऱ्याची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आज वाशिम शहरातील मुख्य चौकात वाशिम पोलिसांकडून विनाकारण डबलसीट वाहधारकांकडून 500 रुपये दंड व मास्क न वापरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे.
काल पहिल्या दिवशी एका दिवसात 300च्या वर वाहनधारकांवर दंडाची कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र, नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने ही कारवाई सुरू असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.