वाशिम : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमी निमीत्त यात्रा भरते. या ठिकाणी देशातील लाखो भाविक हजेरी लावतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने जिल्हा प्रशासनाकडून हा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.
पोहरादेवी येथे शुकशुकाट, कोरोनातून अखिल मानव जातीच्या मुक्ततेसाठी विश्व कल्याण यज्ञाचे आयोजन
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमी निमीत्त यात्रा भरते. पण यंदा कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे येथे आज शुकशुकाट आहे. तसेच कोरोनातून जगाची सुटका व्हावी यासाठी येथे विश्व कल्याण यज्ञाचे आयोजनही करण्यात आले.
खबरदारीचा उपाय म्हणून 22 एप्रिलपर्यंत या परिसराच्या 5 किमी क्षेत्रात मानवी हालचालींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे. दरवर्षी आजच्या दिवशी लाखो भाविकांच्या वर्दळीने फुलून जाणाऱ्या पोहरादेवी येथील मंदिर परिसरात आज मात्र शुकशुकाट आहे. कोरोनाचा संपूर्ण नायनाट होऊन अखिल मानव जातीची या संकटातून मुक्तता व्हावी, याकरीता महंत जितेंद्र महाराज यांच्याकडून गुडीपाडव्यापासून आज नवमीपर्यंत विश्व कल्याण यज्ञाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिली.