वाशिम- एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या संजय राठोड यांची वापसी होणार असल्याचे संकेत काही शिवसेना नेत्यांनी दिले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राठोड यांना मंत्री केलं तर राज्यात आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यावर पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी धर्मपीठावरून चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील जे आंदोलन करणार आहेत, ते आंदोलन माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यासाठी आहे का बंजारा समाजासाठी? असा सवाल मंहत यांनी पाटील यांना केला आहे.
..तर परिणाम भोगावे लागतील; संजय राठोडांना विरोध करणाऱ्या भाजपाला पोहरादेवीच्या महंतांचा इशारा - poharadevi temple
महंत सुनील महाराज म्हणाले की, माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेले कोणतेच आरोप सिद्ध झाले नाहीत. तीन महिने उलटून गेले तरीही राठोड यांच्या विरोधात कोणतीही तक्रारही नाही. त्यानंतरही चंद्रकांत दादा पाटील हे राठोड यांना मंत्री केल्यास राज्यात आंदोलन करणार म्हणतात. मग त्यांचे नेमकं आंदोलन बंजारा समजाविरोधी आहे का? हा प्रश्न आहे.
तर भाजपाला परिणाम भोगावे लागतील-
महंत सुनील महाराज म्हणाले की, माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेले कोणतेच आरोप सिद्ध झाले नाहीत. तीन महिने उलटून गेले तरीही राठोड यांच्या विरोधात कोणतीही तक्रारही नाही. त्यानंतरही चंद्रकांत दादा पाटील हे राठोड यांना मंत्री केल्यास राज्यात आंदोलन करणार म्हणतात. मग त्यांचे नेमकं आंदोलन बंजारा समजाविरोधी आहे का? हा प्रश्न आहे. तसेच आपण जर आंदोलन करणार तर येणाऱ्या काळात बंजारा समाज भारतीय जनता पार्टीला उत्तर देईल, ते आपल्या भोगावे लागेल, असा इशारा यावेळी पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांनी भाजपाला दिला आहे.
बंजारा समाजाच्या एका मुलीच्या आत्महत्येता प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल येईपर्यंत संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेऊ नका, अशी विनंती राज्य सरकारला केली होती. आता मंहत सुनील महाराज यांनी देखील संजय राठोड यांच्या मंत्री पदास विरोध करणाऱ्या भाजपाला इशारा दिला आहे.