वाशिम -अपयश अथवा कमी मार्ग यामुळे विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना यापासुन परावृत्त करण्यासाठी वाशिम शहरातील नालंदानगर येथील गौरी शंकर विद्यालयाने विद्यार्थ्यांना 'आत्महत्या न करण्याची शपथ' देण्यात आली आहे.
वाशिमच्या गौरी शंकर विद्यालयाने विद्यार्थ्यांना दिली 'आत्महत्या न करण्याची शपथ' राज्यात दहावी परीक्षेला आज सोमवारपासून सुरुवात होणार आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच वाशिममधील या विद्यालयात विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याची शपथ देण्यात आली आहे. 'प्रसंगी कुठल्याही परिस्थितीत अपयश व संकटाला न घाबरता आत्महत्या न करण्याची शपथ' मुलांनी घेतली आहे.
हेही वाचा...प्रेम न करण्याची शपथ घेतलेल्या कॉलेजमधील विद्यार्थिनीचा 'प्रेमविवाह'
वाशिम शहरातील नालंदानगर येथील गौरी शंकर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ही शपथ देण्यात आली.
गौरी शंकर विद्यालयाचा हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर दैनंदिन आयुष्यातील कठीण प्रसंगात मार्गदर्शन करण्याचे काम शालेय स्तरावर होणे आवश्यक आहे. गौरी शंकर विद्यालयाने याबाबत पुढाकार घेतला आहे. जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगांना न घाबरता आत्महत्या करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली आहे. ही शपथ विद्यार्थ्यांना भावी संघर्षमय जीवनात प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास विद्यार्थ्यांनाही वाटतो आहे.
हेही वाचा...पंतप्रधान मोदी घेणार सोशल संन्यास.. रविवारनंतर फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अन् यूट्यूबला रामराम..
शिंदे गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाशिम जिल्ह्यात एकूण चार शाळा आहेत. आतापर्यंत या चार शाळांमधील एकाही विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले नाही. त्यात हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात सकारत्मक उर्जा आणि बदल घडवणारा असून इतर शाळांनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ दिल्यास येत्या काळात 'विद्यार्थी आत्महत्या' हा शब्द नाहीसा होईल.