वाशिम- वटपौर्णिमा व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यातील ग्राम चकवा येथे वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास टीमच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, यावर्षी वटपौर्णिमा आणि पर्यावरण दिन एकाच दिवशी आल्याने या दिवसाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले.
वाशिममध्ये अनोखा उपक्रम, वटपौर्णिमेदिवशी वडाच्या झाडांचे रोपण - वाशिममध्ये वटपौर्णिमेदिवशी वडाच्या झाडांचे रोपण
वट पौर्णिमेनिमित्त महिला वडाच्या झाडाला सात फेरे घालून आपल्या पतीच्या दीर्घयुष्याची मागणी करतात. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व विकास संस्थेच्या अध्यक्षा निता लांडे यांनी केवळ सात फेरे मारण्यापेक्षा महिलांनी या सणानिमित्त वडाची झाडे लावावी असा संदेश दिला. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास टीमच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
![वाशिममध्ये अनोखा उपक्रम, वटपौर्णिमेदिवशी वडाच्या झाडांचे रोपण plantation of banyan tree on vat purnima](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10:10-mh-wsm-paryavaran-vruksh-7204024-imran-05062020190301-0506f-1591363981-1012.jpg)
वट पौर्णिमेनिमित्त महिला वडाच्या झाडाला सात फेरे घालून आपल्या पतीच्या दीर्घयुष्याची मागणी करतात. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व विकास संस्थेच्या अध्यक्षा निता लांडे यांनी केवळ सात फेरे मारण्यापेक्षा महिलांनी या सणानिमित्त वडाची झाडे लावावी असा संदेश दिला. यानंतर वसुंधरा वर्षानुवर्षे हिरवीगार राहाण्यासाठी आणि या हिरवेपणाचा लाभ सर्व प्राणीमात्रांना मिळावा या संकल्पनेतून वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सोबतच वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. यावेळी संस्थेच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.