वाशिम- मानोरा दिग्रस रोडवर रामदेवबाबा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावरील कर्मचारी जेवण करण्यासाठी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लॉकर तोडून २ लाख ६० हजार रुपये लंपास केले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मानोरा येथील पेट्रोल पंपावर धाडसी चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मालेगाव पोलिसांनी पेट्रोल पंपावरून चोरी गेलेली १ लाख ४५ हजार ७०० रुपयांची रक्कम आरोपी शिवा पुंजराम साबळे याच्याकडून मालेगाव येथून हस्तगत केली. आरोपी हा मानोरा येथून औरंगाबादला चिंतामणी ट्रॅव्हल्सने जात होता.
शिवा पुंजराम सावबळे (रा. मानोरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर मानोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर आपली तपासाची चक्रे फिरवली व चार आरोपींना मुद्देमालासह अटक केले. मालेगाव पोलिसांनी पेट्रोल पंपावरून चोरी गेलेली १ लाख ४५ हजार ७०० रुपयांची रक्कम आरोपी शिवा पुंजराम साबळे याच्याकडून मालेगाव येथून हस्तगत केली. आरोपी हा मानोरा येथून औरंगाबादला चिंतामणी ट्रॅव्हल्सने जात होता.
हेही वाचा-दोन विद्यार्थिनींना मालेगावला न उतरवता नेले थेट वाशिमला