महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 20, 2020, 6:02 PM IST

ETV Bharat / state

संचारबंदीतून शिथिलता देण्यात आलेल्या उद्योग, व्यवसायासाठी परवानगी प्रक्रिया सुरू

सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणी पुरवठा व इतर विभागांची बांधकामे यासाठी परवानगी देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मोटरपंप, अवजड यंत्र, पाणीपुरवठा करणारे पंप, यंत्र व कृषिसाठी लागणारे पंप व बॅटरी यांची दुकाने सुरु करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

संचारबंदीतून शिथिलता देण्यात आलेल्या उद्योग, व्यवसायासाठी परवानगी प्रक्रिया सुरू
संचारबंदीतून शिथिलता देण्यात आलेल्या उद्योग, व्यवसायासाठी परवानगी प्रक्रिया सुरू

वाशिम - कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ३ मेपर्यंत संचारबंदी लागू आहे. तथापि, अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी जारी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजनेत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

संचारबंदीतून शिथिलता देण्यात आलेल्या उद्योग, व्यवसायासाठी परवानगी प्रक्रिया सुरू
सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणी पुरवठा व इतर विभागांची बांधकामे यासाठी परवानगी देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मोटरपंप, अवजड यंत्र, पाणीपुरवठा करणारे पंप, यंत्र व कृषिसाठी लागणारे पंप व बॅटरी यांची दुकाने सुरु करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या 17 एप्रिलच्या अधिसूचनेत नमूद आवश्यक सेवांबाबतची दुकाने व आस्थापना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आवश्यक कामे आणि पांदण रस्ते यांची परवानगी प्रक्रिया संबंधित कार्यक्षेत्रातील तहसीलदार यांच्या अखत्यारीत पूर्ण केली जाईल. एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून, तर एमआयडीसी क्षेत्राबाहेरील उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्याकडून परवानगी देण्यात येईल. जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतुकीचे परवानगी देण्याचे अधिकार पोलीस विभागाकडे देण्यात आले आहेत. फरसाण, कन्फेक्शनरी इत्यादी सेवांबाबत संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी परवानगी देतील.
कार्यक्षेत्रावरील मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश -
सद्यस्थितीत कार्यक्षेत्रावर कार्यरत मजूरांमार्फतच कामे करण्यात यावीत. बाहेरून कोणतेही मजूर आणण्यास तसेच मजुरांना अथवा कुटुंबियांना कार्यक्षेत्र सोडून जाण्यास प्रतिबंध करावा. मजुरांना कामाच्या ठिकाणावरून बाहेर पडता येणार नाही. मजुरांना क्षेत्रिय बांधकामाच्या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री किराणामाल, अन्नधान्य, भाजीपाला आदी बाबी उपलब्ध करण्याची व्यवस्था कंत्राटदाराने करावी. सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष कामे होत असल्याची खात्री कंत्राटदार व कंत्राटदाराच्या पर्यवेक्षक अभियंत्यांनी करावी त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती क्षेत्रीय ठिकाणी अवलंबावी. कार्य क्षेत्रावरील मजूर, कुटुंबीय कर्मचारी, अभियंते यांच्यापैकी कुणालाही कोरोनासदृश लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल व आरोग्य विभागाला कळविणे व स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील.
कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सर्व मजुरांना व साईटवरील कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती व मार्गदर्शक सूचना मातृभाषेत स्पष्टपणे अवगत कराव्यात. सद्यस्थितीत कार्यक्षेत्रावर कार्यरत मजुरांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी. तसेच कोणत्याही मजुरांची प्रकृती बिघडणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी. तसेच याकरिता वेगळी नोंदवही ठेवण्यात यावी. त्यामध्ये मजुरांची दैनंदिन आरोग्य स्थिती नमूद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मोडक यांनी दिले आहेत.
कोणती आस्थापना कधी सुरू राहील? -
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामाकरिता बी-बियाणे, खतांची आवश्यकता लक्षात घेता कृषी सेवा केंद्रांचा कालावधी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. या कालावधीत कृषी सेवा केंद्र सेवा देतील. दुध संकलन केंद्र सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत व संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतील. बँकांची, एटीएमची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहील. वैद्यकीय सेवा २४ तास सुरू राहतील. याव्यतिरिक्त इतर सर्व परवानगी दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापना, दुकाने यापूर्वी प्रमाणेच सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील. लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संचारबंदी आदेशाचा भंग झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details