पार्डीत 14 दिवस विलगीकरणात राहिलेल्या नागरिकांचा सत्कार - Washim corona update
पार्डी टाकमोर येथील काही कुटुंब रोजगारानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होते. टाळेबंदीमुळे रोजगार बंद पडल्याने त्यांनी आपले गाव गाठून स्वतःहून जिल्हा परिषदेच्या शाळेत 14 दिवस विलगिकरणाचा कालावधीराग पूर्ण केला.
वाशिम - कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाग्रस्त भागातून आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात येते. विलगीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे म्हणून जिल्ह्यातील पार्डी टाकमोर येथे स्वतः हुन शाळेत 14 दिवस विलगीकरणात राहिलेल्या नागरिकांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पार्डी टाकमोर येथील काही कुटुंब रोजगारानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होते. टाळेबंदीमुळे रोजगार बंद पडल्याने त्यांनी आपले गाव गाठून स्वतःहून जिल्हा परिषदेच्या शाळेत 14 दिवस विलगीकरणाचा कालावधीराग पूर्ण केला.
कोरोनाला थांबवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संशयितांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश आहेत. विलगीकरणाबाबत असलेला रोष कमी होऊन याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांचा पुष्पवृष्टी करून सत्कार यावेळी करण्यात येऊन त्यांचा प्रवेश गावात करण्यात आला आहे.