वाशिम - कारंजा लाड येथील सहारा स्कूल जवळ लहान मुलं पळवून नेण्याच्या संशयावरुन नागरिकांनी एका महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेतील सत्यता तपासली असता ती महिला दिल्लीची असल्याचे समजते, अशी माहिती कारंजा शहर पोलिसांनी दिली आहे.
कारंजात मुलं चोरण्याच्या अफवेतून नागरिकांनी महिलेला नेले पोलिसांकडे.. - Rumour
मुलं पळवून नेण्याच्या संशयावरुन नागरिकांनी एका महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेतील सत्यता तपासली असता ती महिला दिल्लीची असल्याचे समजले.
कारंजात मुलं चोरणारी टोळीची अफवा...
आज सकाळी कारंजा शहरामध्ये, मुले चोरणारी महिला आली आहे आणि तिच्याजवळ एक चोरलेला मुलगा आहे अशी अफवा पसरली. कारंजाचे ठाणेदार जाधव यांनी वेळेचा विलंब न करता महिलेला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता, ती महिला दिल्लीची असून कारंजा शहरामध्ये वास्तव्याला असल्याचे समजले. तसेच शहरात पसरलेल्या अफवेमध्ये काहीही तथ्य नसल्याचे दिसून आले.
पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे, की अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.